कोविडकडे वेळीच लक्ष द्या, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

By मनोहर कुंभेजकर | Published: March 24, 2023 06:27 PM2023-03-24T18:27:21+5:302023-03-24T18:27:45+5:30

"काल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेवून कोविड बाबत सविस्तर चर्चा केली..."

Pay attention to covid in time, former health minister Dr. Deepak Sawant's request to the Chief Minister | कोविडकडे वेळीच लक्ष द्या, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

कोविडकडे वेळीच लक्ष द्या, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

googlenewsNext

मुंबई - केंद्र सरकारच्या कोवीड संदर्भात सूचना आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झपाट्याने वाढत असलेल्या कोवीड साठी उच्चस्तरीय बैठक घेतली.मागील काही दिवसात इन्फल्युन्झासह कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.महाराष्ट्रात १ हजार ६१७ कोविड रुग्ण असून पुणे,मुंबई व ठाण्यात सक्रीय कोविड रुग्ण असून येथे कोविडची रूग्ण  संख्या वाढत आहे.त्यामुळे कोविडचा संसर्ग आणि त्याची तीव्रता किती आहे याबाबत शासनाने अभ्यास करून व जागरूक राहून कोविडकडे जातीने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे अशी विनंती राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. काल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेवून कोविड बाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली.

 महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या बघता २०२०-२१-२२ मधे झालेले मृत्यू  याचा पुन्हा एकदा अभ्यास होणे गरजेचे आहे . त्यावेळी राहीलेल्या  गोष्टी पुन्हा  घडू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे, खरतर सध्या ताप सर्दी खूप दिवस चालणारा खोकला घरोघरी दिसत आहे . त्याचे योग्य निदान होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
पण तो नुसता ईन्फ्युएंझा आहे का एच१एन१ आहे की एच३एन२ का रेस्पीरेटरी व्हायरस, किंवा कोवीडचा संसर्ग आहे हे  कळण्यासाठी चांचणी करणे आवश्यक आहे. कारण व्हायरल फिवर आहे म्हणून रुग्ण  ट्रीटमेंट घेतात, पण जर रूग्ण जर या विषयी गाईडलाईन्स पाळत नसेल तर समाजात संसर्ग पसरून पुन्हा एकदा कोवीडची महामारी पसरेल  आशा वर्कर्स,आरोग्य सेवक मोबाईल युनिट्स ,फिरती पथके , याच्या मार्फत लोकजागरण आवश्यक आहे. कोविड पेशन्टस्चा शोध घेणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

महाराष्ट्रात कोविड संदर्भात नेमके काय झाले याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्राची कोवीड व एच३एन२ संख्या ही नेमकी किती आहे, यासाठी लॅब रिपोर्टद्वारे मोठया प्रमाणावर टेस्टींग तसेच जीनोम सिक्वेन्सिंग होणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे होणाऱ्या म्युटेशन वर लक्ष ठेवता येईल.
असल्याचे डॉ.सावंत म्हणाले.

 न्यूयॅाक टाईम्सच्या  गेल्या आठवड्यात प्रसिध्द झालेल्या रिपोर्ट नुसार रेकॅान कुत्रे  चीन च्या वुहान मार्केट मधे विकले जाऊन त्याच्या मांस भक्षणाने कोविडचा संसर्ग झाला असावे असे  निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने  नोंदवले आहे .या मुळे कोवीडची पॅन्ड्मिक आली असावी असे मत लौसियाना स्टेट युनिव्हॅसिटी हेल्थ सायन्सने नोंदविले असल्याची माहिती त्यांनी दिली.

चीन मात्र या विषयावर बोलत नाही. संशोधकानी मात्र २०२० मधे या मार्केट  सील झाल्यानंतर काही जनुकीय नमुने घेतले यांत फरशी पिंजरा कापण्याची जागा याचा समावेश होता, या सर्व नमुन्यातून सार्स कोवी आढळले असा दावा या काही संशोधकानी केला पण या दाव्यावर दुसऱ्या टीमने काही प्रश्न उपस्थित केले, चीनच्या व्हायरॅालॅाजी लॅब मधून हा व्हायरस लिक झाला का? या सर्व प्रश्नांची अजून उकल झाली नाही, मात्र चीनच्या संशोधकानी २०२२ च्या फेब्रुवारी मध्ये  ही बाब नाकारलीअसून  त्यानी हा संसर्ग मार्केट मधे आलेल्या लोकामुळे पसरला प्राण्यामुळे नव्हे असे म्हंटले आहे. या संसर्गामुळे २०१९ व २०२० मध्ये झालेल्या एकूण माता मृत्यू संख्येत वाढ २०२१ मधे अनुक्रमे ४०%व६०% वाढ दिसते    हे निरीक्षण न्यूयार्क टाईम्समधील लेखात नोंदविलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
 

Web Title: Pay attention to covid in time, former health minister Dr. Deepak Sawant's request to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.