Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर-भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 06:25 IST

पहिल्या टप्प्यातील ४.४ किलोमीटर मार्गावर वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचा दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी’ यांच्याकडून ही मेट्रो सुरू करण्यासाठी अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) उद्घाटनासाठी मुहूर्त मिळताच मेट्रो ९ आणि मंडाळे ते डी.एन. नगर मेट्रो २ बी मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ही मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यातील ४.४ किलोमीटर मार्गावर वाहतूक

मेट्रो ९ मार्गिकेची लांबी १३.६ किमी आहे. या मार्गावर १० स्थानके असतील. यातील दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्यातील ४.४ किलोमीटर मार्गावर वाहतूक सुरू केली जाणार आहे. एमएमआरडीएला हा मार्ग सुरू करण्यासाठी सोमवारी सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही मेट्रो सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधीच्या नियोजनानुसार जानेवारी २०२६च्या अखेरीस ही मेट्रो सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता. मात्र मार्गिकेच्या कामांना विलंब झाला. त्यातून गेल्यावर्षीची डेडलाइन हुकली होती.  

‘मेट्रो २ बी’ कधी सुरू होणार?

बहुप्रतीक्षित डी. एन नगर ते मंडाळे मेट्रो २ बी मार्गिकेच्या मंडाळे ते चेंबूर मार्गासाठी अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळून जवळपास तीन महिने झाले तरी एमएमआरडीएला ही मेट्रो सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही. उद्घाटनासाठी मान्यवरांची वेळ न मिळाल्याने ते रखडले आहे. आता पालिका निवडणूक संपल्याने हे लोकार्पण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मेट्रो ९ मार्गिका 

  • लांबी- १३.६ किमी
  • स्थानके- १०
  • खर्च- ६,६०७ कोटी

अशी आहेत स्थानके

  • दहिसर 
  • पांडुरंग वाडी 
  • मीरागाव 
  • काशीगाव
English
हिंदी सारांश
Web Title : Dahisar-Bhayandar Metro Inauguration Cleared: Final CMRS Certificate Received

Web Summary : Dahisar-Kashigaon metro line gets final safety approval, paving way for launch. First phase of Metro 9 and 2B lines likely to open in February after pending inauguration.
टॅग्स :मेट्रोएमएमआरडीए