प्लॅटफॉर्मवरील बोर्डमुळे प्रवाशांचे दीपतात डोळे; रेल्वेच्या डिजिटल बोर्डवर प्रवासी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 09:12 IST2025-06-30T09:08:03+5:302025-06-30T09:12:05+5:30

लोकलच्या अनेक स्थानकांवर लावण्यात आलेले डिजिटल बिलबोर्ड प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत.

Passengers' eyes are dazzled by the board on the platform Passengers are upset with the railway's digital board | प्लॅटफॉर्मवरील बोर्डमुळे प्रवाशांचे दीपतात डोळे; रेल्वेच्या डिजिटल बोर्डवर प्रवासी नाराज

प्लॅटफॉर्मवरील बोर्डमुळे प्रवाशांचे दीपतात डोळे; रेल्वेच्या डिजिटल बोर्डवर प्रवासी नाराज

मुंबई : लोकलच्या अनेक स्थानकांवर लावण्यात आलेले डिजिटल बिलबोर्ड प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या बोर्डांच्या प्रखर उजेडामुळे डोळे दीपतात, डोळ्यांवर ताण येतो, अशी तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे डिजिटल बोर्डांचा प्रकाश कमी करावा किंवा ते काढून टाकावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळप्रमाणे अनेक लोकल प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस या भागातून गेल्यावर त्याचा त्रास होतो. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर चालताना सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर समस्या बनली आहे. रेल्वे या बोर्डच्या माध्यमातून पैसे कमवित असली तरी प्रवाशांच्या सुविधा वाढविण्याचे सोडून त्रास देऊन रेल्वेला फायदा करून घ्यायचा आहे का? असा प्रश्न काही प्रवाशांनी नाव न सांगण्याच्या अटीवर उपस्थित केला.

प.रे.च्या १३ स्टेशनवर १६ डिजिटल बिलबोर्ड

पश्चिम रेल्वेच्या १३ स्थानकांवर १६ डिजिटल बिलबोर्ड बसविण्यात आले आहेत. त्यापैकी ११ दुहेरी बाजूचे आणि पाच एकेरी बाजूचे आहेत. यासाठी २७ मे २०२३ ते २६ मे २०२८ पर्यंतच्या कालावधीसाठी कंत्राट देण्यात आले आहे.

डिजिटल बिलबोर्डचा प्रकाश  कमी जास्त करता येतो जेणेकरून दृश्यमानता चांगली राहील. आणि दिव्यांच्या चकाकीमुळे येणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी टाळता येतील, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे .

Web Title: Passengers' eyes are dazzled by the board on the platform Passengers are upset with the railway's digital board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे