Join us

काळबादेवीत इमारतीचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 18:45 IST

Part of the building collapsed in Kalbadevi : घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, अँबुलन्स आणि बेस्ट वीज विभागाचे कर्मचारी, पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.  

मुंबई - काळबादेवी परिसरातील वर्धमान जंक्शन, बँक ऑफ इंडिया जवळअसलेल्या एका चार मजली इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सायंकाळी ४.३८ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही. घटनास्थळी मुंबईअग्निशमन दल, अँबुलन्स आणि बेस्ट वीज विभागाचे कर्मचारी, पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.  

 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात काळबादेवी परीसरात इमारत कोसळून ६१ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला होता. जमीनीच्या तिसऱ्या मजल्यावर शौचालयाचं प्लास्टर आणि चौथ्या मजल्यावरच्या इमारतीचा भाग कोसळला होता. इतकंच नाहीतर काही भाग लटकललेला दिसत होता. त्यामुळे या इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आलं होतं.

टॅग्स :अग्निशमन दलमुंबईपोलिस