कांदिवली येथे घराचा भाग कोसळून २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 16:14 IST2020-05-10T16:13:47+5:302020-05-10T16:14:12+5:30

कांदिवली पश्चिमेकडील गणेश नगरमधील दिपज्योती चाळतील दोन मजली घराच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली.

Part of house collapses at Kandivali, 2 injured | कांदिवली येथे घराचा भाग कोसळून २ जखमी

कांदिवली येथे घराचा भाग कोसळून २ जखमी

 


मुंबई : कोरोनाच्या संकटातही मुंबईकरांवर उर्वरित संकटे कोसळतच असून, रविवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कांदिवली पश्चिमेकडील गणेश नगरमधील दिपज्योती चाळतील दोन मजली घराच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना घडली.

दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगा-याखाली अडकलेल्या १४ पैकी १२ जणांची सुखरुप सुटका केली. उर्वरित जखमी झालेल्या दोन जणांना कांदिवली येथील आॅस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरमत अलिश आणि शेख बाउल्ला अशी त्यांची नावे आहेत. दुर्घटनेतील जखमींना ढिगा-याखालून बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची मदत घेण्यात आली. रविवारी दिवसभर येथे तैनात अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु होते, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Web Title: Part of house collapses at Kandivali, 2 injured