Join us  

Andheri Bridge Collapse Live Updates: जलद लोकल संध्याकाळी सातच्या आत धावणार; पण स्लो ट्रेनसाठी मध्यरात्र उजाडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 8:59 AM

पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबल्यानं रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी

मुंबई: अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनिश्चित काळासाठी पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्यानं त्याचा मनस्ताप ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो आहे.सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला. या पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. याचा फटका हार्बर रेल्वेलादेखील बसला आहे. पूल कोसळल्यानं दोनजण जखमी झाले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पुलाचा कोसळलेला भाग बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. मात्र जोरदार पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत. 

Live Updates: 

- मध्यरात्रीपर्यंत सुरू होणार स्लो ट्रेन 

- रेल्वेकडून देण्यात आलेले मदत क्रमांक - अंधेरी- 022676 30054चर्चगेट - 02267622540, 02222082809बोरिवली- 02267634053, 02228051580मुंबई सेंट्रल- 02267644257सूरत - 02602401791

- बोरीवली ते वांद्र्यादरम्यान बेस्टच्या 39 अतिरिक्त बसेस धावणार

- बोरीवली पूर्व आणि पश्चिमेकडून बेस्टच्या अतिरिक्त बसेस सुरू

 

 

- रेल्वेचा खोळंबा झाल्यानं बोरीवली ते चर्चगेट दरम्यान 14 अतिरिक्त बसेस धावणार

 

- ढिगारा हटवायला पाच ते सहा तास लागणार

 

 

- पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

- चर्चगेट-वांद्रे सेवा सुरू

- रेल्वे रुळांवरील ढिगारा हटवण्याचं काम सुरू

- अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान घटनास्थळी

- रेल्वे सेवेचा खोळंबा झाल्यानं सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

 

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबईरेल्वेअंधेरी पूल दुर्घटनाअपघात