मुंबई विमानतळावर कार पार्क करा, FASTag ने पैसे भरा; ICICI बँकेची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:15 IST2022-12-15T13:14:48+5:302022-12-15T13:15:20+5:30
विमानतळावर FASTag आधारित पार्किंग सुरू करणारी ICICI बँक ही एकमेव बँक आहे

मुंबई विमानतळावर कार पार्क करा, FASTag ने पैसे भरा; ICICI बँकेची सुविधा
मुंबई: ICICI बँकेने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर पार्किंगसाठी FASTag आधारित पेमेंट सुरु केले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना पार्किंग शुल्क डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे. यामुळे पार्किंग झोनमध्ये पावती फाडण्यासाठी आता यापुढे थांबावे लागणार नाही.
पार्किंग झोनमध्ये बसवलेले स्कॅनर वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवलेला FASTag स्कॅन करतात. प्रवेश/बाहेर पडण्याची वेळ नोंदवतात आणि पार्किंग शुल्क आपोआप वजा केले जाते. मुंबई विमानतळावर FASTag सुविधा सुरू करणारी ICICI बँक ही एकमेव बँक आहे. नुकतेच एका लेनसाठी या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. अन्य लेनमध्येही लवकरच सुरुवात केली जाईल.
ICICI बँकेचा फास्टॅग वापरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, iMobile Pay App, InstaBIZ App, Pockets App वापरू शकतात. जे वापरकर्ते ICICI बँकेचे ग्राहक नाहीत ते वेबसाइटला भेट देऊन FASTag खरेदी करू शकतात