Parel Fire: क्रिस्टल टॉवरमधल्या आगीतील मृतांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:20 IST2018-08-22T13:13:18+5:302018-08-22T13:20:06+5:30
परळमधल्या क्रिस्टल टॉवरच्या 13व्या मजल्यावर भीषण आग लागली होती.

Parel Fire: क्रिस्टल टॉवरमधल्या आगीतील मृतांची नावं
मुंबई- परळमधल्या क्रिस्टल टॉवरच्या 13व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. या आगीवर अग्निशामक दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं आहे. परंतु या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. या आगीत गुदमरून मृत्युमुखी पडलेल्यांची नावं समोर आली आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. बब्लू आणि शुभदा शेळके यांचा मृत्यू झाला आहे, तर शेख माशूक, वकार शेख, कार्तिक सुवर्णा, जयंत सावंत, नवीन संपत, अझहर शेख, डिझोसा, अश्फाक खान, डॉली मैटी, ज्योत्ना बेरा, अक्षता सुवर्णा, वीना संपत, निधी संपत, चंद्रिका सुवर्णा, राजीव नरवाडे, संदीप मांजरे हे लोक जखमी आहेत.
परळमधल्या 17 मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून, 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर लागलेली ही दुस-या श्रेणीची आग आता तिस-यावरून चौथ्या श्रेणीची झाली आहे. त्यामुळे इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. या आगीच्या धुरात 8 जण गुदमरल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.