पनवेल ग्रामीणही भारनियमनमुक्त !

By admin | Published: June 24, 2014 11:59 PM2014-06-24T23:59:51+5:302014-06-24T23:59:51+5:30

शहरी भागाप्रमाणोच ग्रामीण पनवेलमधील गव्हाण, पारगाव आणि वावंजे फिडरवरील गावे येत्या ऑगस्टर्पयत भारनियमनमुक्त करण्यात येणार आहेत.

Panvel Rule is free! | पनवेल ग्रामीणही भारनियमनमुक्त !

पनवेल ग्रामीणही भारनियमनमुक्त !

Next
>रवींद्र गायकवाड - कामोठे
शहरी भागाप्रमाणोच ग्रामीण पनवेलमधील गव्हाण, पारगाव आणि वावंजे फिडरवरील गावे येत्या ऑगस्टर्पयत भारनियमनमुक्त करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने महावितरणकडून जोरदार प्रय} सुरु करण्यात आले आहेत. याकरिता आवश्यक असणा:या सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणच्या अधिका:यांनी सांगितले. 
पनवेल तालुक्याची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल परिसरात सिडको वसाहती विकसित झाल्या आहेत. त्यामुळे हा तालुका शहरी बहुल झाला आहे. ग्रामीण लोकसंख्येपेक्षा शहरी लोकवस्ती अधिक आहे. पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर आणि कामोठे हे 
नोडमध्ये नागरीकरण झाले आहे. या भागात वीज गळती आणि चोरी कमी असल्याने भारनियमन नाही. 
तुलनेने तालुक्यात पारगाव, गव्हाण, वावंजे हा परिसर ग्रामीण असून 
या परिसरात गावांची संख्या जास्त आहे. 
या भागात शहराच्या तुलनेत वीजगळती जास्त असून थकबाकीचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी पर्याय नसल्याने ग्रामीण भागात भारनियमन करावे लागते. असे असले तरी जे ग्राहक वेळेत आणि नियमित वीजबील अदा करतात त्याचबरोबर चोरी करीत नाहीत त्यांच्यावर हा अन्याय असल्याचा मुद्दा प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला होता. त्याची दखल घेत महावितरणच्या पनवेल विभागीय कार्यालयाकडून ग्रामीण भागही भारनियमनमुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वीजगळती रोखण्यासाठी कार्यकारी अभियंता दिलीप मेहत्रे यांनी स्वत: लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर थकबाकी कमी करण्यासाठी वसुलीचे कामही जोरात सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
याशिवाय वीजचोरी थांबविण्यासाठी वेगळी मोहीम उघडली असून धाडी टाकून वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्याचा धडाका वितरणकडून लावण्यात येत आहे. जुनाट यंत्रणा बदलण्याचे कामही हाती घेण्यात आल्याने येत्या एक दोन महिन्यात संपूर्ण पनवेलला नियमित  आणि अखंडित वीजपुरवठा करणो शक्य होणार आहे. 
 
4पनवेल तालुक्यातील नेरे विभागात अनेक गावे दुर्गम असून आदिवासी वाडय़ा आणि पाडय़ांची संख्याही ब:यापैकी आहे. याकरिता स्वतंत्र फिडर असून वळवली, नेरे, विहीघर, नेवाळी, टेभोडे, मालडुंगी, सांगटोली, कोप्रोली, चिपळे, उसर्ली, कोंडाळे, आदई, टेंभघर, चेअरवली, बोनशेत, देहरंग, अंबीवली, भोकरपाडा, बापदेववाडी, चिंचवली, दामनी, दुंदरे, धोदानी, हरीग्राम, खानाव, केवाळे, वाकडी, खैरवाडी, मोर्बे, पालेखुर्द, रिटघर, शिवनसई, तानसई, वाजे, उम्रोली, वाजेपूर, वाघ्याची वाडी असा एकूण 5क् गावांचा समावेश होतो. 8.3 कि.मी. लांबीच्या 22 के.व्ही. क्षमतेच्या या वाहिनीवर घरगुती 11267 आणि व्यावसायिक 249 आणि शेतीपंप 425 इतके ग्राहक आहेत. 
 
4वर्षभरापूर्वी याठिकाणी मोठय़ा प्रमाणात वीजगळती होती. त्याचबरोबर नादुरुस्ती मीटर, बिलांच्या तक्रारी त्याचबरोबर थकबाकी जास्त होती. महावितरणने दहा हजार वीजबिले तपासली, चुकीच्या बिलांत दुरुस्ती केली. नादुरुस्त असलेले मीटर बदलून टाकले. पूर्वी 4क् टक्क्यांवर असलेली वीजगळतीही 2क् टक्क्यांर्पयत आणण्यात महावितरणला यश आले आहे. आगामी काळात हा आकडा शून्यावर आणण्याचा आमचा प्रय} असल्याचे कनिष्ठ अभियंता एस.पी. मचाले यांनी सांगितले. त्यामुळे या 5क् गावांत आता भारनियमन नसून या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेऊन नेरेविभाग भारनियमनमुक्त केला आहे. त्याबद्दल या भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Web Title: Panvel Rule is free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.