विरोधकांचे असत्यकथन : भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:19 AM2018-09-27T04:19:10+5:302018-09-27T04:19:29+5:30

सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर जाऊन असत्यकथन करून जनतेची दिशाभूल करणे हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा धंदा बनला असल्याची टीका करीत नेमके वास्तव जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आले.

Opposition's lies: BJP | विरोधकांचे असत्यकथन : भाजपा

विरोधकांचे असत्यकथन : भाजपा

Next

मुंबई : सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर जाऊन असत्यकथन करून जनतेची दिशाभूल करणे हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा धंदा बनला असल्याची टीका करीत नेमके वास्तव जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आले.
राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याची चुकीची माहिती विरोधकांकडून दिली जात आहे, कृषी क्षेत्रात सरकारने दमदार कामगिरी केली जात असताना विरोधकांकडून टीका केली जात आहे. खोटे बोला पण रेटून बोला हे विरोधकांचे
धोरण असून त्यांना भाजपाचे />कार्यकर्ते या पुढील काळात उघडे पाडतील, असे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर पत्रपरिषदेत सांगितले.
वर्धेचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सेवाग्रामच्या बापुकुटीत
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दबाव आणला गेल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला. कोणत्याही राजकीय पक्षाला बैठका वा कार्यक्रमांसाठी जागा न देण्याचे आश्रम विश्वस्तांचे धोरण आहे, असे ते म्हणाले.


आमची युतीची तयारी

शिवसेनेशी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत युती करण्याची भाजपाची आजही तयारी आहे आणि ती शेवटपर्यंत राहील.
आता निर्णय शिवसेनेने करायचा आहे, असे सांगत मुनगंटीवार यांनी युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला.

Web Title: Opposition's lies: BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.