Join us

३७ एकर भूखंडासाठी धारावी पुनर्वसनाला विरोध; आमदार आशिष शेलार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 13:28 IST

धारावी पुनर्विकासाला आदित्य ठाकरे विरोध करत आहेत. आमच्या माहितीप्रमाणे केवळ २० हजार घरांचे सर्वेक्षण झाले आहे. अजून खूप मोठा विभाग बाकी आहे; पण ते अभ्यास न करता बोलत आहेत. त्यांनी सात लाख घरे असा जो उल्लेख केला तो आकडा आला कुठून? असा सवालही शेलार यांनी यावेळी केला. 

मुंबई : धारावीमध्ये ७० टक्के दलित, मुस्लीम आणि मराठी माणसे आहेत. त्या सर्वांना हक्काची घरे मिळणार असून, मुंबई महापालिकेला १५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अनेक भूखंड बळकावले आहेत. तसाच धारावीमधील नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंडही त्यांना बळकावयाचा असल्यानेच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत, अशी टीका भाजप आ. आशिष शेलार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

धारावी पुनर्विकासाला आदित्य ठाकरे विरोध करत आहेत. आमच्या माहितीप्रमाणे केवळ २० हजार घरांचे सर्वेक्षण झाले आहे. अजून खूप मोठा विभाग बाकी आहे; पण ते अभ्यास न करता बोलत आहेत. त्यांनी सात लाख घरे असा जो उल्लेख केला तो आकडा आला कुठून? असा सवालही शेलार यांनी यावेळी केला. 

फेक नेरेटिव्हचा प्रयत्न -या प्रकल्पामुळे धारावीकर, मुंबईकर, मुंबई महापालिका आणि शासन सर्वांचाच फायदा होणार आहे; परंतु लोकांमध्ये सरकार तुमच्याविरोधी आहे, असे वातावरण निर्माण करून आदित्य ठाकरे यांचा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही शेलार म्हणाले. 

टॅग्स :आशीष शेलारभाजपा