Join us

विरोधी पक्षनेत्यांचे नाव ठरणार पुढील आठवड्यात; काँग्रेसमधील नेत्यांच्या नावांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 05:27 IST

विरोधी पक्षात ज्यांचे जास्त आमदार असतात त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते.

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांचे नाव पुढील आठवड्यात निश्चित होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी दिली.  

विरोधी पक्षात ज्यांचे जास्त आमदार असतात त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते. आता काँग्रेसकडे अधिक आमदार असून पुढील आठवड्यापर्यंत तुम्हाला विरोधी पक्षाचे नाव कळेल, असेही ते म्हणाले. 

१५ ऑगस्टनंतर शरद पवारांचा दौरा सुरू होणार असून उद्धव ठाकरे यांचाही दौरा सुरू होईल, असेही पटोले यांनी सांगितले. महाविकास आघाडी जोमाने निवडणुकांना सामोरे जाईल. जागा वाटपाबाबत सर्व पक्ष गृहपाठ करत आहेत, तो पूर्ण झाल्यानंतर जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. निवडणुका अजून दूर आहेत. प्रत्येक पक्षाकडे तगडे उमेदवार असून त्यादृष्टीने आमची तयारी सुरू असल्याचेही पटोले म्हणाले. 

विराेधी पक्षनेते पदासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते बाळासाहेब थाेरात, विजय वडेट्टीवार  आणि यशाेमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. 

टॅग्स :काँग्रेसएकनाथ शिंदेबाळासाहेब थोरात