Join us  

'ज्यांना अफजल खान म्हटलं, त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मिठ्या मारल्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 3:58 PM

एकेकाळी ज्यांना अफजल खान म्हटले, त्यांनाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिठ्या मारल्या, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

ठळक मुद्देराज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत युती केली आहे.

मुंबई : शिवसेना - भाजपाची युती ही भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेनेने भाजपासोबत युती केली आहे. एकेकाळी ज्यांना अफजल खान म्हटले, त्यांनाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिठ्या मारल्या, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपासह शिवसेनेवर जोरदार टीका केली.  शिवसेना - भाजपाची युती ही भगव्या नाही तर फसव्या विचारांची आहे. अंमलबजावणी संचालनालयापासून वाचण्यासाठी शिवसेने युती केली आहे. तसेच, निवडणुकी आधीचे अधिवेशन म्हणजे युती सरकार आपल्या जाहीरनाम्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वापर करणार आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

याचबरोबर, भाजपा सरकारच्या काळात राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकरी अनुदानाचे नवे गाजर सरकारकडून दाखविण्यात आले. सरकारची पीक योजना फसवी निघाली. त्यामुळे आता सरकारच्या या फसव्या घोषणांना जनता बळी पडणार नाही, असे सांगत राधाकृष्ण  विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

गेल्या वर्षी 28 मार्च 2018 मध्ये 72 हजार नोकरभरतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले होते. मात्र, एक वर्ष उलटून गेले. तरी सुद्धा एकही जागा भरलेली नाही. आता आचारसंहितेच्या तोंडावर पुन्हा नोकरभरतीचे गाजर सरकार दाखवणार आहे, असा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटीलमहाराष्ट्रभाजपाशिवसेना