Join us

माहुलच्या घरांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:22 IST

माहुलमधील पालिकेच्या सदनिका कर्मचाऱ्यांना  १२ लाख ६० हजार रुपयांत विकल्या जात आहेत. गेल्या १५ मार्चपासून ९,०९८ घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अंतिम मुदतीपर्यंत फक्त ३३० अर्ज आले. या अर्जदारांनी अनामत रक्कम आणि नियमानुसार घराची प्रक्रिया केली. सोडत काढून २१ जूनला या घरांचे वाटप केली जाणार होते.

मुंबई : माहुल येथील घरांच्या विक्रीला कमी प्रतिसाद मिळाल्याने मुंबई महापालिकेने काही निकषांत बदल केले. शिवाय मुदतही वाढवली; परंतु तरीही घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. निम्म्यापेक्षा अधिक अर्जदारांनीदेखील घरे नाकारली. त्यामुळे आता संबंधित विभागाने निकषांत बदल करून पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ही घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास आयुक्तांची मंजुरी मिळाल्याने त्याची अंमलबजावणी आता लवकरच सुरू होणार आहे.

माहुलमधील पालिकेच्या सदनिका कर्मचाऱ्यांना  १२ लाख ६० हजार रुपयांत विकल्या जात आहेत. गेल्या १५ मार्चपासून ९,०९८ घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अंतिम मुदतीपर्यंत फक्त ३३० अर्ज आले. या अर्जदारांनी अनामत रक्कम आणि नियमानुसार घराची प्रक्रिया केली. सोडत काढून २१ जूनला या घरांचे वाटप केली जाणार होते. मात्र, ३३० पैकी सुमारे ५० कर्मचाऱ्यांनीच घरांची रक्कम जमा केली. त्यामुळे ३० जुलैपर्यंत मुदत वाढवली. मात्र, फक्त ५३ कर्मचाऱ्यांनीच ७२ घरांसाठी अनामत रक्कम भरली. आता त्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, उर्वरित १९५ अर्जदारांनी घरे नाकारली आहेत.

८,७६८ घरे पडूनच - माहुलमधील घरांकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे ८,७६८ घरे पडून आहेत. या घरांचे करायचे काय, असा पेच पालिकेसमोर आहे. प्रथम श्रेणीतील अधिकारी वगळून इतर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरांसाठी संधी दिली होती. मात्र, अल्प प्रतिसादामुळे पुन्हा निकषांत बदल करत ती निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकासुंदर गृहनियोजनकर्मचारी