Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या युवा सेनेत नेत्यांच्या मुलांना संधी; कार्यकारिणीत कोणाला लागली लॉटरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 05:52 IST

एकनाथ शिंदे गटाने आता आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेलाही शह देण्यासाठी पाऊल उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने आता आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेलाही शह देण्यासाठी पाऊल उचलले आहे.  शिंदे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली. यात शिंदे यांच्याबरोबर असलेल्या नेत्यांच्या मुलांना संधी दिली आहे.

शिंदे गटाच्या युवा सेनेची कार्यकारिणी याप्रमाणे : आविष्कार भुसे (उ. महाराष्ट्र), अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील (मराठवाडा), विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे (कोकण - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग), किरण साली, सचिन बांगर (प. महाराष्ट्र), दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक (कल्याण भिवंडी), नितीन लांडगे, विराज म्हामूणकर, मानित चौगुले, राहुल लोंढे (ठाणे, नवी मुंबई व पालघर), समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे (मुंबई), ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील (विदर्भ).

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेना