हेल्थ वेलनेस सेंटरचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 20:48 IST2019-02-21T20:47:38+5:302019-02-21T20:48:05+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर सुरू करण्यात आली आहेत.

हेल्थ वेलनेस सेंटरचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उदघाटन
मुंबई - ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांचं उद्धाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील 10,668 उपकेंद्रांचे, 605 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 1828 ग्रामीण प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे हेल्थ वेलनेस सेंटरचे मध्ये रूपांतर करण्यात आले असून, या सर्व केंद्रांचे एकत्रित उदघाटन करण्यात आले आहे.