Join us  

...तुम्ही खुशाल श्वेतपत्रिका काढा; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 10:03 PM

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकाम कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर त्यांनी  श्वेतपत्रिका काढून जरुर जाहीर करावी आम्ही त्याचे स्वागत करु असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत करणार असल्याचे सांगितल होतं. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी. त्याचप्रमाणे केंद्राच्या मदतीची कोणतीही वाट न पाहता तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी असं त्यांनी सांगितलं. तसेच आम्ही केंद्र सरकारच्या मदतीची वाट बघितली नाही. तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

विकासकामांची माहिती मागवणार आहे. त्यावर किती खर्च झाला, किती कामे शिल्लक आहेत, कुठे होत आहेत. कामे का अडली आहेत, किती प्रगती झाली आहे. तातडीची कामे कोणती आणि कमी महत्वाची कामे कोणती, याचा लेखाजोखा मी मागविला असल्याचे सांगत फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिकाच काढणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. तसेच मंत्रिमंडळाचा तात्पुरता विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्याला आर्थिक मदत मिळविण्यासाठी ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटला जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशेतकरीराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना