मुंबई लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता 'नो एंट्री'!

By मोरेश्वर येरम | Published: November 27, 2020 12:42 PM2020-11-27T12:42:06+5:302020-11-27T12:50:26+5:30

मुंबई लोकलमध्ये महिला प्रवासी लहानमुलांना सोबत घेऊन आल्या तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.

Only women passengers no children allowed in Mumbai local trains | मुंबई लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता 'नो एंट्री'!

मुंबई लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता 'नो एंट्री'!

Next
ठळक मुद्देमहिला प्रवाशांसोबत वारंवार लहान मुलं प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलंयमुंबईतील रेल्वे स्थानकांवर आता गेटवरच आसीएफ जवान तैनात असणारमहिला प्रवाशासोबत लहान मुल आढळल्यास स्टेशनवरुन घरी परतावं लागणार

मुंबई
राज्यात अनलॉकच्या टप्प्यात राज्य सरकारने मुंबईच्या लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मूभा दिली होती. पण अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करता येईल, त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 

मुंबई लोकलमध्ये महिला प्रवासी लहानमुलांना सोबत घेऊन आल्या तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही, असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यानुसार आता मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर आरसीएफ जवान तैनात असणार आहे. महिला प्रवाशासोबत लहान मुल आढळून आलं, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबईत लोकलमध्ये सध्या महिला प्रवाशांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मूभा आहे. १७ ऑक्टोबरपासून महिलांच्या प्रवासाला परवानगी मिळाली होती. पण त्यासाठी काही वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर पुढे शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Only women passengers no children allowed in Mumbai local trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.