तलावांमध्ये केवळ ४४ टक्के जलसाठा, मुंबईतील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:06 AM2019-02-12T02:06:19+5:302019-02-12T02:06:32+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल दोन लाख दशलक्ष लीटरने कमी आहे. त्यामुळे तलावातील राखीव जलसाठ्यावरच आता महापालिकेची मदार आहे.

 Only 44 percent of the water stock in the ponds, water logging signs in Mumbai | तलावांमध्ये केवळ ४४ टक्के जलसाठा, मुंबईतील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे

तलावांमध्ये केवळ ४४ टक्के जलसाठा, मुंबईतील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे

- शेफाली परब-पंडित

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल दोन लाख दशलक्ष लीटरने कमी आहे. त्यामुळे तलावातील राखीव जलसाठ्यावरच आता महापालिकेची मदार आहे. परिणामी, उन्हाळ्यात मुंबईत पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.
यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे तलावांमध्ये ९३ टक्केच जलसाठा जमा झाला. ही तफावत वाढून १५ टक्के जलासाठा कमी झाल्यामुळे १५ नोव्हेंबर, २०१८ पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत तलावांची पातळी खालावली असून, सध्या केवळ ४४.६८ टक्के जलसाठा आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोणतेही पर्यायी स्रोत नसल्याने महापालिकेची मदार आता राखीव जलसाठ्यांवर आहे.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रमुख सात तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असावा लागतो. मात्र, या वर्षी १३ लाख ३५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला. बाष्पीभवन, चोरी आणि गळतीमध्येही लाखो लीटर पाणी वाया जात असते. त्यामुळे तलावांमध्ये आजच्या तारखेला सहा लाख ४६ हजार ७४१ दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे. ही मुंबईसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
मुंबईत २००९ आणि २०१४ मध्ये कमी पाऊस झाला होता. या काळात मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळेस पाणीकपात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली होती, तसेच राखीव जलसाठ्यातूनही पाणी उचलण्यात आले होते.

नियोजन सुरू : तलावांमधील जलसाठा कमी होत असल्याने लवकरच राखीव साठ्यातून पाणी उचलावे लागेल. अप्पर वैतरणात ९२ हजार ५०० दशलक्ष लीटर तर भातसा तलावांत दोन लाख २५ हजार दशलक्ष लीटर राखीव जलसाठा आहे. मात्र, भातसा तलाव हे राज्य सरकारच्या अखत्यारित असल्याने राखीव साठा उचलण्यासाठी त्यांची परवानगी घेण्यात येईल, सध्या यासाठी नियोजन सुरू असल्याचे जल अभियंता खात्यातील एका अधिकाºयाने सांगितले.

आकडेवारी दशलक्ष लीटर
२०१९- ६४६७४१ (४४.६८ टक्के)
२०१८- ८५०२०६ (५८.७४ टक्के)
२०१७ - ८४८४८६ (५८.६२ टक्के)

जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये
तलाव कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १४९.६१
तानसा १२८.६३ ११८.८७ १२४.१३
विहार ८०.१२ ७३.९२ ७६.६५
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३६.१६
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६००.३७
भातसा १४२.०७ १०४.९० १२५.५२
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २६३.२४

सध्या शिल्लक जलसाठा
तलाव दशलक्ष लीटर टक्के
अप्पर वैतरणा १२६०२९ ५५
मोडक सागर ३२४३० २५
तानसा ६७४४६ ४६२२२
मध्य वैतरणा ७९७१९ ४१
भातसा ३२५९९३ ४५
विहार १०७३३ ३८.७५
तुळशी ४३९१ ५४

प्रमुख सात तलावांत १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर साठा असला तरच वर्षभर पाणी पुरते.

Web Title:  Only 44 percent of the water stock in the ponds, water logging signs in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई