स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:25 IST2025-06-11T13:23:52+5:302025-06-11T13:25:46+5:30

Mumbai Online Sex Racket Busted: मुंबईत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आठ जणांना मलबार हिल पोलिसांनी अटक केली असून १० महिलांची सुटका करण्यात आली.

Online Sex Racket Busted in Mumbai: 8 Arrested, 10 Women Rescued by Malabar Hill Police | स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!

स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!

स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या आठ जणांना मलबार हिल पोलिसांनी अटक केली असून १० महिलांची सुटका केली. दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड पूर्व परिसरातील सैधाम मंदिराजवळ हा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

मलबार हिल पोलिसांना मुंबईतील ग्रँट रोड पूर्वेजवळ सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर मलबार हिल पोलिसांनी सापळा रचून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून २.०४ ग्रॅम ड्रग्ज आणि ८४ हजार रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी ८ आरोपींना अटक करण्यात आली असून १० महिलांची सुटका करण्यात आली. आरोपींनी वैयक्तिक फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकलले, असे तपासातून समोर आले.

आठ जणांना अटक
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, सोनी गणेश शर्मा, रिंजी निमा शेर्पा, कृष्णा बिलत भुईया, विक्रम रजनी भुईया, अरुण दामोदर यादव, महेशा एच. शिवन्ना, पप्पू कुमार सरजू यादव आणि अमित कुमार कन्हिया यादव, अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

पोलीस तपास सुरू
याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, अनैतिक वाहतूक कायदा आणि अंमली पदार्थ आणि मानसोपचार पदार्थ कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Online Sex Racket Busted in Mumbai: 8 Arrested, 10 Women Rescued by Malabar Hill Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.