Join us

ऑनलाइन वर्गाला फक्त पाच दिवस दिवाळीची सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 05:10 IST

Online class : शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी २१ दिवस होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या ८० ऐवजी ७६ करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी १८ दिवस केली.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने १२ ते १६ नोव्हेंबर अशी फक्त पाच दिवसच ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली. .शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी २१ दिवस होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या ८० ऐवजी ७६ करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी १८ दिवस केली. पण कोरोनामुळे अभ्यास उशिरा सुरू झाल्याने दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी फक्त पाच दिवसांची केली. त्यामुळे दिवाळीची सुट्टी हळूहळू कमी करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :ऑनलाइनशिक्षणदिवाळी