मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामावेळी एका कामगाराचा मृत्यू, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 01:50 IST2019-09-14T01:50:27+5:302019-09-14T01:50:40+5:30
सीप्झ येथील घटना

मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामावेळी एका कामगाराचा मृत्यू, एकजण जखमी
मुंबई : कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) सुरू आहे. या मार्गिकेचे काम सात टप्प्यात करण्यात येत आहे. या सातव्या पॅकेजमध्ये सीप्झ येथे शुक्रवारी दुपारी अडीचच्या दरम्यान अचानक जमीन धसल्याची घटना घडली. या अपघातामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, तर एका कामगाराला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मेट्रो -३ मार्गिकेच्या कामावेळी अचानक जमीन धसल्याने ही घटना झाली असून या कामगारांना तात्काळ तेथून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना उपचारासाठी असून त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या घटनेबाबत कंत्राटदाराची चौकशी करण्यात येणार असून कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीमार्फत देण्यात आली.