एकतर्फी प्रेमातून प्रकार; होकार मिळविण्यासाठी तरुणीच्या फोटोशी छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:23 IST2018-05-30T06:23:36+5:302018-05-30T06:23:36+5:30

तरुणीच्या फोटोसोबत छेडछाड करत, तिचे फोटो स्वत:सोबत जोडून ते सोशल मीडियावर शेअर करत, लग्नासाठी धमकावल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघडकीस आला.

One type of love; Tension of the girl's photo to get a success | एकतर्फी प्रेमातून प्रकार; होकार मिळविण्यासाठी तरुणीच्या फोटोशी छेडछाड

एकतर्फी प्रेमातून प्रकार; होकार मिळविण्यासाठी तरुणीच्या फोटोशी छेडछाड

मुंबई : तरुणीच्या फोटोसोबत छेडछाड करत, तिचे फोटो स्वत:सोबत जोडून ते सोशल मीडियावर शेअर करत, लग्नासाठी धमकावल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघडकीस आला. एकतर्फी प्रेमातून रत्नागिरीच्या दीपक पुजारी या तरुणाने हे कृत्य केले.
तरुणीने वरील प्रकाराबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी पुजारीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रविवारी रत्नागिरीमधून पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पुजारी हा रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रहिवासी आहे. पुजारीचे त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, तिने साफ नकार दिला होता. अखेर तिचा होकार मिळविण्यासाठी त्याने हा प्रताप केल्याचे तपासात समोर आले.

Web Title: One type of love; Tension of the girl's photo to get a success