Join us

घराचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:35 IST

आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

ठळक मुद्देडोंगरातील साई धाम मॉलजवळील चिंच बंदर येथील एका घराचा स्लॅब कोसळून एकाच मृत्यू झाला आहे. मृत इसमाचे नाव अद्याप समजले नसून शब्बीर शेख (२२) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुंबई - डोंगरी येथे काही दिवसांपूर्वी इमारत कोसळलेली घटना ताजी असताना डोंगरातील साई धाम मॉलजवळील चिंच बंदर येथील एका घराचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाले आहेत. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

डोंगरी येथे काही दिवसांपूर्वी इमारत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हाहाकार माजला होता. त्यानंतर आज पुन्हा डोंगरात चिंच बंदर येथे घराचा स्लॅब कोसळला आहे. या घराचे बांधकाम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी दोघांपैकी एकाच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मृत इसमाचे नाव अद्याप समजले नसून शब्बीर शेख (२२) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :मुंबईजे. जे. रुग्णालयमृत्यू