Join us

अल्पवयीन मुलीची बोली दिड लाख, सापळा रचून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 00:11 IST

या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात २८ डिसेम्बर रोजी बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम सह अन्य कायदे कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलं आहे . 

मीरारोड - वेश्यागमना साठी बळजबरी आणलेल्या अल्पवयीन मुलीची दिड लाख रुपयांची बोली लावणाऱ्या दोन महिला दलालांना पोलिसांनी भाईंदर येथून अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली कि , एक दलाल महिला व तिची साथीदार ह्या दोघी वेश्यागमना साठी मुली पुरवीत आहेत .

एका अल्पवयीन मुलीला वेश्यागमना साठी दिड लाखांच्या बोलीवर ग्राहकास दिले जाणार असल्याचे कळल्याने पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे सह निलंगे, शिंदे , तिवले , गावडे यांचे पथक घेऊन भाईंदर पश्चिमेच्या कस्तुरी गार्डन जवळ साई केशव माधव इमारतीतील चिल आउट हॉटेल जवळ सापळा रचला. महिला दलालने पुरुष ग्राहकाला कडून दिड लाख रुपये स्वीकारताच पथकाने छापा मारून त्या दोन्ही महिलांना अटक केली. अल्पवयीन पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात २८ डिसेम्बर रोजी बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम सह अन्य कायदे कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलं आहे . 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस