One and a half hundred warriors freed from the corona are back on the field | जिगर लागते! कोरोनामुक्त झालेले दीडशे योद्धा पुन्हा मैदानात

जिगर लागते! कोरोनामुक्त झालेले दीडशे योद्धा पुन्हा मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायन येथील पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील ५० डॉक्टर आणि दीडशे परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र या आजारावर मात केल्यानंतर कोणताही ब्रेक न घेता ते पुन्हा एकदा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे प्रशासनासह सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


मुंबईत दररोज सरासरी १४०० ते १५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. पालिकेच्या विविध रुग्णालयात तसेच कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या या रुग्णांवर हजारो डॉक्टर आणि परिचारिका उपचार करीत आहेत. या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून पीपीई किट, सॅनिटायझेशन अशा खबरदारीच्या सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत.


मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या सतत संपर्कात असल्यामुळे अनेक डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. यामध्ये पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांसह इतर सर्व विभागातील कर्मचाºयांचाही समावेश आहे.
मे अखेरपर्यंत पालिकेच्या दीड हजारांहून अधिक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे २५ जणांचा मृत्यू झाला आहे.


३५२ जणांना लागण
सायन रुग्णालयात कोविड विभागात काम करणाºया एकूण ३५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ६० डॉक्टर्सचा समावेश आहे.
या डॉक्टरांचे चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात क्वारेंंटाइन करण्यात आले.
आतापर्यंत यातील ५० डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी कोरोनामुक्त होऊन पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर, इतर क्वारंटाइन करण्यात आलेल्या कर्मचाºयांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: One and a half hundred warriors freed from the corona are back on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.