आईच्या उपचाराच्या बहाण्याने ‘लक्ष्मी’लाच गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:06 IST2023-09-25T12:06:08+5:302023-09-25T12:06:20+5:30

बहाणा करून भामट्याने भाजी विकणाऱ्या लक्ष्मी अमगोथ (३८) यांना गंडवले.

On the pretext of mother's treatment is being cheated | आईच्या उपचाराच्या बहाण्याने ‘लक्ष्मी’लाच गंडा

आईच्या उपचाराच्या बहाण्याने ‘लक्ष्मी’लाच गंडा

मुंबई :

माझी आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे,  असा बहाणा करून भामट्याने भाजी विकणाऱ्या लक्ष्मी अमगोथ (३८) यांना गंडवले. नकली दागिने देऊन महिलेकडून दीड लाख रुपये नेले. या फसवणूक प्रकरणात महिलेने बोरीवली पोलिस ठाण्यात तक्रार केली असून पोलिस भामट्याचा शोध घेत आहेत. 

बोरिवली पश्चिम परिसरात लक्ष्मी अमगोथ या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे १९ सप्टेंबर रोजी त्यांचा व्यवसाय सुरू असताना एक जण तेथे आला. त्याने आई आजारी असल्याचे सांगितले. तिच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे, दागिने गहाण ठेवायचे आहेत, असे सांगितले. अनेकदा भाजी विकत घेण्यासाठी आल्यामुळे लक्ष्मी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडील बोरमाळ दीड लाख रुपयांत विकत घेतली. दरम्यान, लक्ष्मी परिचयाच्या सोनाराकडे गेल्या. त्याने बोरमाळ नकली असल्याचे सांगितले.

Web Title: On the pretext of mother's treatment is being cheated