सायनमध्ये ऑन ड्युटी पोलिसाने सोडले प्राण; कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 09:30 IST2026-04-02T09:29:34+5:302026-04-02T09:30:20+5:30

रात्रपाळी कर्तव्यावर आलेल्या शिवतारे यांना पहाटे पाचच्या सुमारास छातीत दुखू लागले होते.

On Duty Heart Attack Claims Life of 42 Year Old Sub Inspector at Sion Police Station | सायनमध्ये ऑन ड्युटी पोलिसाने सोडले प्राण; कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सायनमध्ये ऑन ड्युटी पोलिसाने सोडले प्राण; कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : सायन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक संदीप शिवतारे (४२) यांचा बुधवारी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांसह सहकाऱ्यांना धक्का बसला आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रपाळी कर्तव्यावर आलेल्या शिवतारे यांना पहाटे पाचच्या सुमारास छातीत दुखू लागले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मूळचे सातारा जिल्ह्यातील धनगरवाडीचे रहिवासी असलेले शिवतारे हे वरळी पोलिस वसाहतीत पत्नी, दोन मुली, आई आणि भाऊ यांच्यासोबत राहायचे.

Web Title : मुंबई: सायन में ड्यूटी पर पुलिस अधिकारी की दिल का दौरा पड़ने से मौत

Web Summary : मुंबई के सायन पुलिस स्टेशन में तैनात उप-निरीक्षक संदीप शिवतारे (42) की ड्यूटी के दौरान दिल का दौरा पड़ने से मौत हो गई। उन्होंने सीने में दर्द की शिकायत की और उन्हें अस्पताल ले जाया गया, जहां उन्होंने अंतिम सांस ली। उनके परिवार में पत्नी, दो बेटियां, मां और भाई हैं।

Web Title : Mumbai: On-duty police officer dies of heart attack in Sion.

Web Summary : Sub-Inspector Sandeep Shivtare, 42, died of a heart attack while on duty at Sion police station in Mumbai. He complained of chest pain and was rushed to the hospital, where he passed away. He is survived by his wife, two daughters, mother, and brother.