ट्रॅकवर उडी घेऊन वाचविला वृद्धाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:54 AM2021-01-03T01:54:31+5:302021-01-03T01:54:34+5:30

 सोलंकी यांना बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर त्यांच्या मुलासोबत घरी पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले. सोलंकी यांच्या मुलानेही निकम व बोरीवली लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले. 

The old man's life was saved by jumping on the track | ट्रॅकवर उडी घेऊन वाचविला वृद्धाचा जीव

ट्रॅकवर उडी घेऊन वाचविला वृद्धाचा जीव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकल पकडण्यासाठी पुलाचा वापर न करता रेल्वे ट्रॅकवरून निघालेल्या वृद्धाचा जीव स्वतःचा जीव धोक्यात घालून बोरीवली लोहमार्ग पोलिसात कार्यरत पोलीस शिपाई एस. बी. निकम यांनी वाचवला. 
गणपत सोलंकी (६०) हे दहिसरमध्ये राहत असून काही कामानिमित्त खारला निघाले होते. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आलेली धीमी लोकल त्यांनी पाहिली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून ती पकडता यावी, यासाठी पुलाचा वापर न करता ४ क्रमांकाच्या ट्रॅकवर उडी मारली. मात्र, त्याच वेळी ३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना विरार धीमी गाडी येताना दिसली. या गाडीखाली आपण चिरडले जाणार, या भीतीने गाेंधळले. त्यांना प्लॅटफॉर्मवर पुन्हा चढताही येत नव्हते. घाबरून ते तिथेच उभे राहिले. 
निकम यांच्या हे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ट्रॅकवर उडी मारून सोलंकी यांना खेचून वर घेतले आणि मागोमाग विरार लोकल त्या ट्रॅकवरून पुढे गेली.  सोलंकी यांना बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर त्यांच्या मुलासोबत घरी पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सांगितले. सोलंकी यांच्या मुलानेही निकम व बोरीवली लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले. 

Web Title: The old man's life was saved by jumping on the track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.