वडाळ्यामध्ये अपघातानंतर ऑईल टँकरने घेतला पेट; एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 06:49 IST2018-11-26T23:51:29+5:302018-11-27T06:49:15+5:30

भक्ती पार्क जवळील मोनो रेल्वे स्टेशननजीक ऑईल टँकरचा अपघात झाल्याने भीषण आग लागली आहे.

Oil tanker burns in Wadala | वडाळ्यामध्ये अपघातानंतर ऑईल टँकरने घेतला पेट; एक ठार

वडाळ्यामध्ये अपघातानंतर ऑईल टँकरने घेतला पेट; एक ठार

मुंबई : भक्ती पार्क जवळील मोनो रेल्वे स्टेशननजीक ऑईल टँकरचा अपघात झाल्याने भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये एकाचा मृतदेह सापडला असून टँकरचा चालक असण्याची शक्यता आहे.


हा अपघात पावणे अकराच्या सुमारास घडला. घटनास्थळी एक टेम्पोही उलटलेला असल्याने टेम्पोला धडकून टँकर उलटल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही आग विझविण्यासाठी पोलीस, अग्निशामक दल आणि अँम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली होती.

आग विझविल्यानंतर टँकरच्या केबिनमधून एक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला असून त्याला पोलिसांच्या व्हॅनमधून शीव रुग्णालयात नेण्यात आले. तसेच हा टँकर कोणत्या कंपनीचा होता हे अद्याप समजू शकले नसल्याने भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियमसह एजिसच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे अग्निशामन दलाने सांगितले.

 

Web Title: Oil tanker burns in Wadala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग