अरे बापरे! एका महिन्याचे वीज बिल ४८ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 02:09 AM2020-07-23T02:09:21+5:302020-07-23T02:09:26+5:30

संनियंत्रण यंत्रणा उभारण्याची गरज

Oh my god One month electricity bill is Rs. 48,000 | अरे बापरे! एका महिन्याचे वीज बिल ४८ हजार रुपये

अरे बापरे! एका महिन्याचे वीज बिल ४८ हजार रुपये

Next

मुंबई : कोरोनासोबत मुंबईकरांवर आणखी एक संकट कोसळले आहे ते म्हणजे वाढीव वीज बिलाचे. वाढीव वीज बिलांनी मुंबईकरांना जोरदार शॉक दिला असतानाच दक्षिण मुंबईमधील बेस्टच्या अ‍ॅड. मराठे यांना जून महिन्याचे वीज बिल तब्बल ४८ हजार रुपये आले आहे.
वीज बिलाची ही रक्कम पाहून बेस्टच्या या ग्राहकाची पायाखालची जमीनच सरकली असून, केवळ मलाच नाहीतर, वीज बिलांच्या रकमांनी होरपळलेल्या प्रत्येक वीज ग्राहकाला न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणणे अ‍ॅड. मराठे यांनी मांडले आहे.

दरम्यान, वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. ग्राहकाच्या गाºहाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

मुंबई शहरात बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. पूर्व उपनगरात टाटा आणि अदानीकडून तर भांडुप व मुलुंडमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मात्र कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्यभरातील वीज ग्राहकांसह मुंबईतील वीज ग्राहकांना आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. दक्षिण मुंबईतील लॅमिंग्टन येथे वास्तव्यास असलेल्या अ‍ॅड. पल्लवी मराठे यांना जून महिन्याचे वीज बिल तब्बल ४८ हजार रुपये आले आहे.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मराठे यांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये भरले होते. जून महिन्यातही ७ हजार रुपये भरले होते. मात्र सध्या कोरोनाच्या काळात लोकांचे रोजगार गेले आहेत. लोकांना अडचणी आहेत. आणि अशातच जर ग्राहकांना वाढीव वीज बिले पाठविली तर लोकांचे जगणे कठीण होईल. परिणामी, वाढविण्यात आलेल्या दरानुसार डिसेंबरपर्यंत ग्राहकांना वीज बिले पाठवू नका.
उलटपक्षी मध्य प्रदेश सरकारने ज्या प्रमाणे वीज ग्राहकांना अनुदान देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेदेखील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे अ‍ॅड. मराठे यांचे म्हणणे आहे.

हिवाळा, लॉकडाऊन आणि उन्हाळा

लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान, देयके मार्च २०२० च्या आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारावर आकारण्यात आली होती. त्या वेळी हिवाळा चालू असल्यामुळे वीज वापर नेहमीच कमी असतो आणि त्यामुळे सरासरी देयके कमी रकमेची होती. आताची देयके उन्हाळ्यातील असून या वेळी वीज वापर सामान्यत: जास्त असतो आणि देयके नेहमीच जास्त रकमेची असतात. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या प्रत्येक महिन्यासाठीच्या सरासरी देयक रकमेच्या समायोजनानंतर शिल्लक देय रकमेसह जास्त रकमेचे देयक देण्यात आले आहे.

Web Title: Oh my god One month electricity bill is Rs. 48,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज