बा महाराजा, सुखरूप ने रे..., गाऱ्हाणे घालत मुंबईतून कोकणवासीय एसटीने गावाकडे झाले रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 10:38 IST2025-08-25T10:38:39+5:302025-08-25T10:38:59+5:30

Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाला दोन दिवस उरले असताना मुंबईतून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीयांचा गावाकडे जात आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांसह एसटी बसस्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. रविवारी सुटीचा दिवस साधून चाकरमान्यांनी मुंबई सेंट्रल, परळ, कुर्लासह प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.

Oh Maharaja, please take care of yourself..., Konkan residents leave Mumbai for their village by ST, complaining | बा महाराजा, सुखरूप ने रे..., गाऱ्हाणे घालत मुंबईतून कोकणवासीय एसटीने गावाकडे झाले रवाना

बा महाराजा, सुखरूप ने रे..., गाऱ्हाणे घालत मुंबईतून कोकणवासीय एसटीने गावाकडे झाले रवाना

मुंबई - गणेशोत्सवाला दोन दिवस उरले असताना मुंबईतून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीयांचा गावाकडे जात आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांसह एसटी बसस्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. रविवारी सुटीचा दिवस साधून चाकरमान्यांनी मुंबई सेंट्रल, परळ, कुर्लासह प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. रविवारी परळ डेपोत एसटी बुक केलेल्या कोकणातील मंडळांनी प्रवाशांना कोकणात सुखरूप पोहोचवण्यासाठी गाऱ्हाणं घालून एसटीतून आपल्या गावाकडे रवाना झाले.

गणेशोत्सवासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची तयारी पूर्ण झाली असून, कोकणात जाण्यासाठी जादा बस मुंबईत दाखल आल्या आहेत. यंदा पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातून १,७५० बस मागविण्यात आल्या आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या  कोकणवासीयांनी रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्याने एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ४४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५१०३ जादा बस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. 

विशेष रेल्वेगाड्या
रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल या स्टेशनवरून रेल्वेने देखील अनेक कोकणवासीय रविवारचा मुहूर्त साधून गावाला निघाले. रेल्वेने गणपतीसाठी विशेष गाड्या सोडल्यामुळे कोकणवासीय भाविकांना दिलासा मिळाला आहे.

तात्पुरते थांबे सुरू
एसटी महामंडळाने नियमित एसटी स्टँडवरील गर्दी टाळण्यासाठी मुंबईत तात्पुरते बस थांबे सुरू केले आहेत. त्यामुळे रविवारी एसटी डेपोसह शहरातील रस्त्यांवर देखील एसटी उभ्या असल्याचे पाहायला मिळाले. 
गेल्या ३५ वर्षांपासून कोकणवासीयांची सुविधा व्हावी, यासाठी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ एसटीचे ग्रुप बुकिंग करत असल्याचे  मंडळाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले. 

 

Web Title: Oh Maharaja, please take care of yourself..., Konkan residents leave Mumbai for their village by ST, complaining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.