'अधिकारी ब्रदर्स'चे गौतम अधिकारी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 19:12 IST2017-10-27T08:45:41+5:302017-10-27T19:12:21+5:30

टीव्ही क्षेत्रातील दिग्गज आणि 'अधिकारी ब्रदर्स'चे गौतम अधिकारी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Officer of Brothers' Gautam Doshi | 'अधिकारी ब्रदर्स'चे गौतम अधिकारी यांचे निधन

'अधिकारी ब्रदर्स'चे गौतम अधिकारी यांचे निधन

मुंबई - टीव्ही क्षेत्रातील दिग्गज आणि 'अधिकारी ब्रदर्स'चे गौतम अधिकारी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गौतम अधिकारी हे टीव्ही क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व होते. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) सकाळी त्यांचे निधन झाले. गौतम अधिकारी यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गौतम अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रवी आणि मुलगी उर्वी आहेत.

गौतम अधिकारी यांनी मराठी टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शनामध्ये रेकॉर्ड केला. सर्वाधिक एपिसोड्सचं दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारी यांनी रचला आहे.  यामुळे त्यांचं नावदेखील ‘लिम्का बुक’मध्ये नोदवलं गेले. शिवाय, मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या हिंदीतील सब टीव्ही या चॅनेलची स्थापना गौतम आणि त्यांचे भाऊ मार्कंड अधिकारी यांनी केली.

Web Title: Officer of Brothers' Gautam Doshi

टॅग्स :Deathमृत्यू