Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; दोन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 06:31 IST

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पाटणकर यांच्या प्रोफाइलवरून १ ऑगस्टला ट्वीटरवर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करण्यात आली होती.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी सायन पोलिसांनी वरळीतील युवासेना शाखा अधिकारी व सोशल मीडिया शाखा समन्वयक रोहन पाटणकर व पुणे विभागाचे युवासेना आयटी शाखेचे प्रमुख नितीन शिंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.  

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पाटणकर यांच्या प्रोफाइलवरून १ ऑगस्टला ट्वीटरवर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री यांच्या चेहऱ्याचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. तसेच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे याने या पोस्टला दुजोरा देऊन ते छायाचित्र पुन्हा रिट्वीट केल्याचा आरोप आहे. या पोस्टविरोधात विजय पगारे यांनी तक्रार करत भाजप नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी असे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीशिवसेनापोलिस