हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 02:24 IST2019-07-30T02:24:41+5:302019-07-30T02:24:43+5:30

चैताली केणी हिचा डिसेंबर २0१७ मध्ये योगेश केणी याच्याही विवाह झाला होता

Offense against eight including husband for torture for dowry | हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

मुंबई : हुंडा म्हणून माहेरहून फ्लॅट, गाडी आणि महाबळेश्वर येथे बंगला देण्यात यावा यासाठी चैताली केणी या विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून मालाड पोलिसांनी तिच्या पतीसह कुटुंबातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चैताली केणी हिचा डिसेंबर २0१७ मध्ये योगेश केणी याच्याही विवाह झाला होता. मालाड पोलीस ठाण्यात चैतालीने केलेल्या तक्रारीनुसार विवाहानंतर महिन्याभरानंतर माहेरहून एलसीडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणावी यासाठी तिला धमकावण्यात येऊ लागले. तिने नकार दिल्याने तिचा मोबाइल ताब्यात घेऊन तिचा छळ सुरू झाला. त्यानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून माहेरहून हुंडा म्हणून फ्लॅट, गाडी आणि महाबळेश्वर येथे बंगला घेऊन द्यावा यासाठी तगादा लावण्यात आला. याबाबत चैतालीने तक्रार केल्यानंतर पती योगेश, सासरा हरेश्वर, सासू मंगला, दीर ललित, जाऊ हिमाली, नणंद नयना चिंबईकर, भारती भांजी आणि मामा प्रशांत किणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Offense against eight including husband for torture for dowry