महिलांनो, एसटीचे हाफ तिकीट आता घरून करा बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 07:20 AM2023-05-08T07:20:30+5:302023-05-08T07:28:13+5:30

राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

Now women can book ST bus tickets online | महिलांनो, एसटीचे हाफ तिकीट आता घरून करा बुक

महिलांनो, एसटीचे हाफ तिकीट आता घरून करा बुक

googlenewsNext

मुंबई : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने १७ मार्चपासून महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्यास अडचणी येत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, आता घरी बसून तिकीट बुकिंग करणे शक्य आहे. दररोज १८ ते २० लाख महिला सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत.

एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला सन्मान योजनेचे तिकीट  ऑनलाइन बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत होत्या.  याबाबत काही प्रवाशांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच त्यामध्ये  सुधारणा करण्यात आली असून, आता ऑनलाइन बुकिंग करता येत आहे.

अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, CM शिंदेंची मणिपूर, आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

महिला सन्मान योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्यात दररोजच्या महिला प्रवाशांची संख्या ९ लाखांनी  वाढली आहे. महिला सन्मान योजनेमुळे एसटी महामंडळाला दररोज ९ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. 

              - शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,  एसटी महामंडळ

Web Title: Now women can book ST bus tickets online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.