आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 05:42 IST2025-10-21T05:41:12+5:302025-10-21T05:42:30+5:30
उद्धव म्हणाले की, नरकचतुर्दशी म्हणजे नरकासुराचा वध झाल्याचा दिवस. नरकासुर कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाशिकच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा राजीनामा देत मातोश्री निवासस्थानी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव यांनी नाशिकमध्ये मी पुन्हा येईन. येथील महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
गायकवाड कुटुंबासह प्रा. डॉ. लक्ष्मण शेंडगे, वैभवी घाडगे, बबिता मोरे, हिमाया बागुल, सीमा ललवाणी यांच्यासह सातपूरमधील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. संगीता गायकवाड यांचे स्वागत करताना उद्धव म्हणाले की, नरकचतुर्दशी म्हणजे नरकासुराचा वध झाल्याचा दिवस. नरकासुर कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मतांची चोरी करून सत्तेत बसलेल्यांची चोरी पकडली आहे.
आपण कोणाला पोसत आहोत, हे डोळे उघडून बघा. इतिहासात पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.