'मुंबईतील लोकांच्या जिवाची किंमत पाच लाख का, हे आता मला समजलं", गोरेगावमधील घटना, व्हिडीओ बघून तुमचाही होईल संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:38 IST2026-02-20T13:36:09+5:302026-02-20T13:38:48+5:30
मुंबईत पूर्व उपनगरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनेकांनी लहान मुलाला असं धोकादायक पद्धतीने उभे करणाऱ्याला जबर दंड ठोठावण्याची मागणी केली आहे.

'मुंबईतील लोकांच्या जिवाची किंमत पाच लाख का, हे आता मला समजलं", गोरेगावमधील घटना, व्हिडीओ बघून तुमचाही होईल संताप
मुंबईतील एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही याची दखल घेतली आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लहान मुलाला मोटारसायकलवरून धोकादायक पद्धतीने घेऊन जात आहे. त्यावर एकाने संताप व्यक्त म्हटले आहे की, अशा प्रकारचे व्हिडीओ बघून मला आता कळले आहे की, या शहरात माणसाच्या जिवाची किंमत पाच लाख रुपये का आहे?
सेफ रोड स्क्वॉड अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. गोरेगाव पश्चिममधील एमटीएनएल रोड उड्डाण पुलावर हा व्हिडीओ शूट केला गेला आहे. १९ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला आहे.
या व्यक्तीविरोधात वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई कारवाई करण्यात यावी. मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्तांचे याकडे लक्ष वेधण्यात आले. त्याला जबर दंड आणि शिक्षा द्या, अशी मागणी पोलिसांकडे केली गेली.
@MTPHereToHelp
— SaferRoadsSquad🚦 (@SaferRoadsSquad) February 19, 2026
Biker (MH02DD5246) riding dangerously with a small child standing on the pillion seat ; extreme risk to the child's life & other road users.
19/02/2026 @1730 hrs at Goregaon West MTNL SV Road flyover.
This endangerment should attract strict MV Act sections.… pic.twitter.com/kKx8PQfjxi
'रोड्स ऑफ मुंबई' खात्यावरूनही हा व्हिडीओ पोस्ट करत संताप व्यक्त करण्यात आला. 'असे व्हिडीओ बघूनच मला आता कळायला लागलं आहे की, या शहरात माणसाच्या जिवाची किंमत पाच लाख रुपये का आहे?', असे त्या व्यक्तीने म्हटले आहे.
After watching such videos, I now understand why human life is valued at ₹5 lakhs in this city!
pic.twitter.com/TQL8O2Trpy— Roads of Mumbai (@RoadsOfMumbai) February 19, 2026
दिव्या गंडोत्रा टंडन यांनीही बेजबाबदार पालकत्वावरून राग व्यक्त केला आहे. धावत्या मोटारसायकलवर कोणत्याही सुरक्षेशिवाय व्यक्ती लहान मुलाला घेऊन जात आहे. अचानक ब्रेक दाबलाा गेला किंवा लहान मुलगा घसरला दुर्दैवी घटना घडू शकते. त्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.