Join us

गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 06:09 IST

जो गमछा खांद्यावर टाकून फिरत आहात, तो तोंडाला लावून चेहरा लपवत फिरावे लागेल, असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना दिल्यानंतर लगेच काही दिवसांत त्याला स्थगिती दिली गेली खरी; पण या पदावरून शिंदेसेनाविरुद्ध अजित पवार गट असा वाद अजूनही धगधगत आहे. त्यातच आता दोन्हींकडून एकमेकांना धमक्या देणे सुरू झाले आहे.

अजित पवार गट आणि शिंदेसेना आमने-सामने आल्याचे चित्र आहे. रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांनाच मिळाले पाहिजे यासाठी शिंदेसेना आक्रमक आहे. त्यांनी अदिती तटकरे हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.

गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत...गुवाहाटीला गेलेल्या शिंदेसेनेच्या या आमदारांनी (भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी) तेथे बाहेर आणि हॉटेलमध्ये काय काय केले याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, दाखविले तर अडचण होईल. जो गमछा खांद्यावर टाकून फिरत आहात, तो तोंडाला लावून चेहरा लपवत फिरावे लागेल, असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला. एकनाथ शिंदे यांनी आपल्या तीन आमदारांना आवरावे, नाहीतर आम्ही जसेच्या तसे उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

अजून तीन जिल्ह्यांमध्ये व्यक्त होताहेत नाराजीचे सूरपालकमंत्रिपदाला स्थगिती दिलेले गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर नाशिकमध्ये झळकले. नाशिक पालकमंत्रिपद अजित पवार गट व शिंदेसेनेलाही हवे आहे. ‘मी गरीब असल्याने मला गरीब जिल्हा (परभणी) दिला’ या शब्दात नरहरी झिरवाळ यांनी नाराजी बोलून दाखविली. कोल्हापूर पालकमंत्रिपद हे शिंदेसेनेला दिल्याने अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ नाराज आहेत.

टॅग्स :रायगडसुनील तटकरेअदिती तटकरेमहायुती