मेमनशी एक रुपयाचाही व्यवहार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:52 AM2019-10-16T06:52:15+5:302019-10-16T06:52:37+5:30

प्रफुल्ल पटेल; न्यायालयाच्या आदेशानुसारच हिस्सा दिल्याचा दावा

Not even a rupee deal with Memon | मेमनशी एक रुपयाचाही व्यवहार नाही

मेमनशी एक रुपयाचाही व्यवहार नाही

googlenewsNext

मुंबई : मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा मेमन हिच्याशी कोणत्याही प्रकारची व्यावसायिक भागीदारी नाही. तिच्यासोबत पटेल कुटुंबीयांनी एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी केला.


इक्बाल मिर्चीसोबत पटेल यांच्या मिलेनीयर डेव्हलपर या कंपनीच्या संबंधाबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्यानंतर भाजपनेही याबाबत खुलाशाची मागणी करीत पटेल यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली होती. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत खुलासा केला. मुंबईतील ज्या मालमत्तेवरून सध्या वादंग निर्माण झाला ती जमीन पटेल कुटुंबीयांनी १९६३ साली ग्वाल्हेरच्या राजघराण्याकडून विकत घेतली होती. त्यात पटेल कुटुंबाचे २१ सदस्य होते. १९७० पासून येथे इमारत आहे. पुढे कौटुंबिक वाद झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले आणि १९७८ साली याचा ताबा कोर्ट रिसीव्हरकडे गेला. दरम्यानच्या काळात सीजे हाउसच्या मागच्या बाजूस झालेल्या अतिक्रमणाचा विषय न्यायालयात प्रलंबित होता. न्यायालयाने ताबेदाराला त्या मालमत्तेत जागा देण्याचे आदेश दिले होते. ज्यांनी अतिक्रमण केले त्या व्यक्तीने पुढे त्यांचा हिस्सा हजरा मेमन यांना विकला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भाडेकरू अथवा ताबेदारांना जो वाटा देणे आवश्यक होते तेच आम्ही दिले. पटेल कुटुंबाने स्वत:हून एक रुपयाचाही व्यवहार या प्रकरणी केला नाही, असा खुलासा पटेल यांनी केला.


पालिकेकडून सीजे हाउसला धोकादायक ठरविण्यात आल्यानंतर मिलेनीयर डेव्हलपरने तिथे पुनर्विकास केला. मिलेनीयर डेव्हलपरमध्ये
हजरा मेमन यांची कुठल्याही प्रकारची भागीदारी नाही. एसआरए अथवा तत्सम प्रकल्पात ताबेदारांना
जसा हिस्सा द्यावा लागतो त्याच धर्तीवर सीजे हाउसमधील हिस्सा हजरा मेमन यांनादेखील द्यावा लागला होता, असे त्यांनी सांगितले.
तेव्हासुद्धा आमच्या वकिलाने सदर व्यक्तीविरोधात प्रतिबंध आहेत का, त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन निर्बंध आहेत का, याची खातरजमा केली होती. मेमनविरोधात प्रतिबंध नव्हते. त्या करदात्या होत्या. १९९९ साली त्यांना पासपोर्टही देण्यात आले होते, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. मेमन यांच्याऐवजी कोणत्याही सरकारी यंत्रणेने ती जागा ताब्यात घेतली असती तर त्यांना आम्ही त्यातला हिस्सा दिला असता, असेही त्यांनी सांगितले.

ईडीची नोटीस नाहीच
ईडीने चौकशीसाठी बोलावल्याची कोणतीच नोटीस मला मिळालेली नाही. कायद्याचे पालन करणारा नागरिक असल्याने तशी काही नोटीस आल्यास नक्कीच सहकार्य करू, चौकशीला सामोरे जाऊ, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. परंतु, एखादी नोटीस मला येण्याआधीच त्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचत असल्याबाबत त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले.
मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी हजर राहण्याची पटेल यांना ईडीकडून नोटीस
च्सक्तवसुली संचालनालयाने पटेल यांना येत्या शुक्रवारी (दि. १८ आॅक्टोबर) मुंबईतील ईडीच्या बेलार्ड पियर्ड परिसरातील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.
च्या वेळी त्यांच्याकडे वरळीतील सीजे हाउसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदीबाबत चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती
सूत्रांनी दिली.
च्महाराष्टÑात विधानसभा निवडणुकीची धामधूम लक्षात घेता पटेल यांच्या होणाऱ्या चौकशीमुळे कुठलेही राजकीय पडसाद उमटू नयेत याबाबत पुरेशी दक्षतादेखील घेण्यात येणार आहे.
च्त्यानुसार या परिसरात
पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात
आले आहे.

Web Title: Not even a rupee deal with Memon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.