लोकशाहीमध्ये कुणीही कुणावर दबाव आणू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:50 AM2018-01-20T00:50:53+5:302018-01-20T00:51:01+5:30

देशात सत्ता भाजपाची आहे की काँग्रेसची हा मुद्दाच नाही. आमचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी त्यांची व्यथा मांडली आहे

Nobody should put pressure on democracy! | लोकशाहीमध्ये कुणीही कुणावर दबाव आणू नये!

लोकशाहीमध्ये कुणीही कुणावर दबाव आणू नये!

Next

डोंबिवली : देशात सत्ता भाजपाची आहे की काँग्रेसची हा मुद्दाच नाही. आमचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी त्यांची व्यथा मांडली आहे, त्यांना जर वेगवेगळ््या धमक्या येत असतील; तर त्या प्रकरणाची केंद्र सरकारसह गुजरात सरकारने सखोल चौकशी करावी. जो गुंता असेल तो वेळीच सोडवावा, अशी ठाम भूमिका विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने घेतली. लोकशाहीत कोणीही कोणावर दबाव आणू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी ‘लोकमत’कडे मांडले.
तोगडिया यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत माज्या एन्काऊंटरचा कट असल्याचे वक्तव्य करत मते मांडली. खंत व्यक्त केली. ती करताना ते भावूक झाले होते. त्यानंतर ठिकठिकाणच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘आय सपोर्ट डॉ. प्रवीण तोगडिया’ ही मोहीमच सोशल मीडियावर सुरू केली आहे. मात्र स्थानिक स्तरावरील कोणताही कार्यकर्ता, पदाधिकारी या विषयावर भाष्य करणार नाही, तो कार्यरत राहील, असे आदेशही देण्यात आल्याचे ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी जी भूमिका घेतील त्याचे पालन करायचे, असे धोरण ठरले असल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार गायकर यांच्याशी चर्चा झाली. त्यात त्यांनी तोगडियांनी जे आरोप केले आहेत, त्याची सखोल चौकशी करावी, पारदर्शकता आणावी, असे स्पष्ट केले. गायकर यांनी बुधवारी तोगडिया यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती.
प्रवीण तोगडिया हे मोठे नेते असून त्यांच्या जीवाला धोका असेल, तर त्याबद्दल प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितच चिंता आहे, अशी प्रतिक्रिया विहिंपचे कोकण प्रांताचे सहमंत्री संदीप तोंडापूरकर यांनी दिली.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात विश्व हिंदू परिषदेचे साडेतीन लाख सदस्य असून त्यापैकी बहुतांश कार्यकर्त्यांना तोगडियांनी जे धमकी, दडपशाही आणि दडपणाचे वातावरण मांडले आहे, जो अनुभव त्यांनी घेतला आहे, त्यातील सत्यता पडताळावी, असे वाटते. त्यातूनच ‘आय सपोर्ट डॉ. प्रवीण तोगडिया’चे संदेश फिरत असल्याचेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा केवळ हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर निवडून आली आहे. विकासाच्या नव्हे! जेव्हा २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या; तेव्हा किती जणांनी गुजरातचे रस्ते बघितले होते? तिथल्या सुखसुविधा बघितल्या, हाही मोठा प्रश्न आहे. एवढेच काय, तर कल्याण-डोंबिवली परिसरातही अनेक वर्षे शिवसेना-भाजपाची सत्ता आहे, ती विकासामुळे नव्ह;े तर केवळ हिंदुत्त्वाच्या जोरावरच आहे. हे भाजपानेही विसरु नये. १९९९ च्या दरम्यान ‘शायनिंग इंडिया’ने भाजापाला घरचा रस्ता दाखवला होता हे लक्षात घेत सरकराने काम करायला हवे, अशी कडवट प्रतिक्रिया डोंबिवलीतील बजरंग दलाच्या पदाधिकाºयाने दिली. केडीएमसीतील स्मार्ट सिटीची स्वपे्न आज नव्हे, तर अनेक वर्षांपासून दाखवली जात आहेत. त्यामुळे नव्याने भाजपात आलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यांनी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारु नयेत, असा टोलाही त्या पदाधिकाºयाने लगावला.

Web Title: Nobody should put pressure on democracy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.