Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणावतला दिलासा नाहीच, मानहानीच्या दाव्यावर स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 14:12 IST

Kangana Ranaut: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावरील सुनावणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

मुंबई - प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावरील सुनावणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

कंगना राणावत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जावेद अख्तर यांच्यावर शेरेबाजी केली होती. त्यावर अख्तर यांनी आक्षेप घेत कंगनाविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. दरम्यान, कंगनाने अख्तर यांच्याविरोधात क्रॉस तक्रार दाखल केली. गुन्हेगारी कट रचणे, खंडणी वसूल करणे, तिच्या खासगी आयुष्यात लुडबूड करणे इत्यादी आरोप कंगनाने अख्तर यांच्यावर केले आहेत. अख्तर आणि आपण केलेली तक्रार एकाच घटनेतून करण्यात आली आहे. त्यामुळे दोन तक्रारींवर वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ नयेत. याकरिता दोन्ही तक्रारींवर एकदम सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी कंगनाने याचिकेद्वारे केली होती. तिची याचिका फेटाळताना न्या. प्रकाश नाईक यांच्या एकलपीठाने म्हटले की, अख्तर यांनी दाखल केलेल्या दाव्यावरील खटला सुरू झाला आहे. या टप्प्यावर कंगनाने केलेली विनंती मान्य करू शकत नाही.

टॅग्स :कंगना राणौतमुंबई हायकोर्ट