यापुढे पावसाळ्यात ‘तुंबई’ होणार नाही! पालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 09:48 AM2023-12-20T09:48:41+5:302023-12-20T09:49:27+5:30

बॉक्स नाल्यांचे रुंदीकरण, ४२ कोटींचा खर्च 

No more 'Water logging in monsoon the municipality started taking measures inn mumbai | यापुढे पावसाळ्यात ‘तुंबई’ होणार नाही! पालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात

यापुढे पावसाळ्यात ‘तुंबई’ होणार नाही! पालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात

मुंबई : पश्चिम उपनगरातील पाली गाव, वांद्रे पश्चिम, शेर्ली राजन व्हिलेज, गोरेगावमधील बांगूर नगर परिसरात अतिवृष्टी आणि भरतीच्या काळात सखल भागात पाणी साचते. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, या सखल भागात पाणी साचण्यापासून दिलासा मिळणार असून, या कामासाठी ४२ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती पालिकेने दिली.  

पश्चिम उपनगरात वाढणारी नागरी वस्ती आणि उपनगराचा होणारा विस्तार याचा विचार करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळण्यासाठी नाले स्वच्छता, रुंदीकरण आणि विस्तारीकरणाची कामे महापालिका क्षेत्रात युद्धपातळीवर सुरू आहेत. शिवाय मुंबईतील सखल भागांमध्ये अंधेरी सबवेसह अनेक नागरी वस्तीच्या भागात नागरिकांना पाणी साचण्यापासून कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. हे काम वर्षभरात पूर्ण होणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली. वेरावली जलाशयाच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.  १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बदलून त्या जागी १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. 

एच/पश्चिम विभागातील वांद्र्यातील पाली गाव आणि ३३वा रस्ता येथे पूरस्थिती कमी करण्यासाठी आरसीसी बॉक्स नाल्यांचे बांधकाम/ सुधारणा ८ कोटी १७ लाख ५ हजार

एएच/पश्चिम विभागातील वांद्रे येथील शेली राजन व्हिलेज येथे पूरस्थिती कमी करण्यासाठी आरसीसी बॉक्स नाल्यांचे बांधकाम/ सुधारणा
११ कोटी ५४ लाख २० हजार

पी/दक्षिण विभागातील गोरेगावमधील बांगूर नगर गोरेगावमध्ये एसडब्ल्यूडीचा विस्तार आणि पुनर्बांधणी ९ कोटी १२ लाख १२ हजार

आर/मध्य विभागातील बिरोवळी येथील योगी नगर रस्त्यापासून लिंक रोड ते चंदावरकर नाल्यापर्यंत २ मीटर रुंद एसडब्ल्यूडीचे बांधकाम
१३ कोटी ६७ लाख ५५ हजार

यामुळे मुबलक पाणीपुरवठा :

 यामुळे अंधेरी पूर्व - पश्चिम व जोगेश्वरीतील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाने व्यक्त केला आहे. 
 या जलवाहिन्या बदलण्यासाठी तब्बल १३ कोटी ८८ लाख रुपये खर्च येणार आहे. 

  पाणीगळती रोखण्यासह अंधेरी येथील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी वेरावली जलाशय येथे १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 जलवाहिन्यांची क्षमता वाढविल्यास अंधेरी पूर्व व पश्चिम, जोगेश्वरीतील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल. नागरिकांना पाणी मिळेल, असा विश्वास जल अभियंता विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: No more 'Water logging in monsoon the municipality started taking measures inn mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.