कंदिलावरही No Mask, No Entry
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 17:32 IST2020-11-14T17:31:56+5:302020-11-14T17:32:18+5:30
Diwali News : बहुरंगी आकाश कंदील मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

कंदिलावरही No Mask, No Entry
मुंबई : बोरिवली परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर दिवाळीनिमित्त लावण्यात आलेला बहुरंगी आकाश कंदील मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या आकाश कंदिलाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर कोविडबाबत जनजागृती संदेश प्रदर्शित केले आहेत.
कोविड या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये विविध प्रकारे करण्यात येत असलेल्या जनजागृती विषयक प्रयत्नांचाही समावेश आहे. याच अनुषंगाने हा कंदील लावण्यात आला आहे. दुसरीकडे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून या काळात कोरोना आणि प्रदूषण वाढणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे. दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद,उत्साह,समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शुभेच्छा पालिकेने दिल्या आहेत.