मुंबईकरांना दिलासा! तूर्तास लॉकडाऊन नाही, पण...; पालिका प्रशासनाने दिला असा इशारा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 08:20 PM2021-03-09T20:20:42+5:302021-03-09T20:22:30+5:30

मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

No lockdown at the moment but Municipal administration issued a warning | मुंबईकरांना दिलासा! तूर्तास लॉकडाऊन नाही, पण...; पालिका प्रशासनाने दिला असा इशारा! 

मुंबईकरांना दिलासा! तूर्तास लॉकडाऊन नाही, पण...; पालिका प्रशासनाने दिला असा इशारा! 

Next
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (lockdown) जाहीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईकरांनी खबरदारीचे नियम पाळले नाही, तसेच रुग्णवाढ होतच राहिली तर लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (lockdown) जाहीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण २३ हजारांपर्यंत वाढल्याने दैनंदिन रुग्ण नोंद वाढली आहे. मुंबईत स्थिती नियंत्रणात असल्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन करण्यात येणार नाही. परंतु, मुंबईकरांनी खबरदारीचे नियम पाळले नाही, तसेच रुग्णवाढ होतच राहिली तर लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा पालिका प्रशासनाने (Municipal administration) दिला आहे. (No lockdown at the moment but Municipal administration issued a warning)

पुण्यात कोरोना रूग्णवाढीची होतेय पुनरावृत्ती : मंगळवारी एक हजाराहून अधिक नवे बाधित 

मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. मुंबईतही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लागणार का? याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मात्र दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण २३ हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्णनोंद वाढली आहे. 

रुग्णवाढ दिसत असली तरी चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पाच टक्के घट आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असा पुनरुच्चार अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला आहे. मात्र लोकलसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे. वारंवार सूचना करुनही लोकं मास्क लावत नाहीत. त्यामुळे यापुढेही रुग्ण वाढ अशीच कायम राहिल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला. 

Video : कोरोना टेस्ट होत असताना सचिन तेंडुलकरनं केलं प्रँक, घाबरले डॉक्टर

नियम मोडणाऱ्यांवर पालिकेची नजर... - 
लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, पब, नाईट क्लब, अशा ठिकाणी खबरदारीचे नियम पाळले जात नसल्याचे उजेडात आले आहे. यामुळे अशा ठिकणी धाड टाकण्यासाठी प्रत्येक विभागात तीन पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर इमारती-सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांना नियमांचे कठोरपणे पालन करावे, पॉझिटिव्ह, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांनी क्वारेंटाइनचे नियम जबाबदारीने पाळावेत, त्यांच्यावर पदाधिकार्‍यांनीही नजर ठेवावी, नियम मोडणाऱ्यांची तक्रार करावी, अशी सूचनाही पालिकेने केली आहे. 

रुग्ण एकाच ठिकाणी वाढत नसून विखुरलेल्या स्वरुपात आहेत. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन करण्याची गरज नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णवाढ अशीच होत राहिल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील. मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे-सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोनाचा परिणाम, जळगाव शहरात ११ ते १५ मार्चदरम्यान जनता कर्फ्यू

तारीख            रुग्ण      मृत्यू
१ मार्च              ८५५        ४
२ मार्च             ८४९         २
३ मार्च             ११२१         ६
४ मार्च             ११०३        ५
५ मार्च             ११७३       ३
६ मार्च             ११८८       ५
७ मार्च             १३६०      ५
८ मार्च             १००८      ४
 

Web Title: No lockdown at the moment but Municipal administration issued a warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.