Join us  

यंत्रणेच्या अनास्थेने एकही जीव जाऊ नये - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 2:37 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : भंडारा घटनेची राज्यात यापुढे पुनरावृत्ती होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोरगरीब, सर्वसामान्य मोठ्या विश्वासाने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी येतात. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घ्या. भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात घडलेल्या घटनेची यापुढे पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी देत शासकीय यंत्रणेच्या अनास्थेने एकही जीव जाता कामा नये, असे यंत्रणेला बजावून सांगितले.

भंडारा जिल्हा रुग्णालयात शनिवारी निष्पाप दहा बालकांचा आगीत होरपळून जीव गेला. रविवारी दुपारी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेष नवजात अतिदक्षता कक्षाची पाहणी केली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ही घटना नेमकी कशामुळे घडली, उपकरण किंवा अनियंत्रित व्यवस्था, या आशयाच्या तक्रारी आल्या होत्या काय, याबाबतही शहानिशा केली जाणार आहे. कोरोनामुळे आरोग्य विभाग तणावाखाली आहे. या कामामुळेही त्या बाबीकडे दुर्लक्ष झाले काय? हेही तपासले जाणार आहे. आगीचे नेमके कारण काय? याचा प्रथमदर्शनी तपास केला जाणार आहे. आसवं पुसायला मुख्यमंत्री आले बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः भंडारा तालुक्यातील भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत पाेहाेचले. अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांनी या मातांना दिला. सोनझारी पाच-सहाशेची वस्ती. मुख्यमंत्र्यांनी वस्तीत जाऊन तेथील तीन कुटुंबांची भेट घेतली.   

टॅग्स :आगउद्धव ठाकरेमुख्यमंत्री