रावसाहेब दानवेंना मातोश्रीवर नो एंट्री, अमित शाहांसोबत मुख्यमंत्री मातोश्रीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 20:45 IST2018-06-06T20:09:22+5:302018-06-06T20:45:50+5:30

भाजपाध्यक्ष अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

No Entry for Raosaheb Danve in Matoshri | रावसाहेब दानवेंना मातोश्रीवर नो एंट्री, अमित शाहांसोबत मुख्यमंत्री मातोश्रीवर

रावसाहेब दानवेंना मातोश्रीवर नो एंट्री, अमित शाहांसोबत मुख्यमंत्री मातोश्रीवर

मुंबई - भाजपाध्यक्ष अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मात्र शाह यांच्यासोबत असलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मातोश्रीच्या मार्गावरून परत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या भेटीसाठी शाह यांच्यासोबत भाजपाकडून केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. 
 शिवसेनेच्या मंत्र्यांनी दानवे यांच्याबाबत तक्रार केल्याने चर्चेअंती दानवेंना मातोश्रीच्या वाटेवरून माघारी पाठवले आहे. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना खूपवेळा अडचणीत आणल्याने दानवेंबाबत शिवसेनेच्या वर्तुळात नाराजी आहे. त्यामुळेच दानवेंना मातोश्रीच्या वाटेतून परत पाठवण्यात आले. दरम्यान, आता शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि भाजपाकडून अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस चर्चेत सहभागी होतील. 

Web Title: No Entry for Raosaheb Danve in Matoshri