Join us

मेट्रो स्थानकांखाली खासगी वाहनांना ‘नो एण्ट्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 05:48 IST

शहरात ठिकठिकाणी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे सध्या शहरवासीयांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : शहरात ठिकठिकाणी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे सध्या शहरवासीयांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता मेट्रो रेल्वेच्या स्थानकांखाली ५० मीटरपर्यंत खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन एमएमआरडीए प्रशासनाने हा निर्णय तत्काळ अंमलात आणण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.सध्या मुंबईत मेट्रो-३ भुयारी मार्ग, मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. या कामांमुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या भागांत वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो. याविषयी एमएमआरडीए प्रशासनाकडे शहरवासीयांकडून लाखोंनी तक्रारी आल्या होत्या. या मेट्रो प्रकल्पातील सर्व मेट्रो स्थानकांचा विकासही एमएमआरडीए प्रशासनालाकरायचा आहे. त्यामुळे हा वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊनमेट्रो स्थानकांखाली ५० मीटर अंतरापर्यंत खासगी वाहनांनाप्रवेश बंदी करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. तसेच बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका केल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. तसेच कामे सुरू असलेली मेट्रो स्थानके पूर्णपणे तयार झाल्यावर प्रवाशांच्या सोयीकरिता मेट्रो स्थानकांखाली मोठे पदपथ तयार करण्यात येणार आहेत.>स्वयंचलित यंत्रांतून खाद्य पदार्थ, शीतपेयेया मेट्रो स्थानकांचा विकास कशा तºहेने करण्यात यावा यासाठी एक पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून या पुस्तिकेच्या मदतीने स्थानकांचा विकास करण्यास मदत होणार आहे.फेरीवाल्यांना या स्थानकांपासून दूर ठेवण्यासाठी खाद्य पदार्थ आणि शीतपेयांचा पुरवठा करणारी स्वयंचलित यंत्रे या नवीन होणाºया प्रकल्पांच्या मेट्रो स्थानकांमध्ये बसविण्यात येणार असल्याची माहिती राजीव यांनी दिली.

टॅग्स :मेट्रो