Join us

No Confidence Motion: अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने ठरवला 10.30 चा मुहुर्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 09:50 IST

मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत होणाऱ्या चर्चेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

मुंबई - मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत होणाऱ्या चर्चेला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, अविश्वास प्रस्तावादरम्यान नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आज सकाळी 10.30 ते 11 च्या दरम्यान योग्य तो अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या अविश्वास प्रस्तावादरम्यानच्या भूमिकेबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. 

शिवसेनेने गुरुवारी व्हीप बजावत शिवसेनेच्या खासदारांना एनडीए सरकारच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले होते. पण काही वेळाने शिवसेनेने आपल्या भूमिकेबाबत पुन्हा संभ्रम निर्माण केला. दरम्यान, आज सकाळी सामनातील संपादकीयमधून शिवसेना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना "सगळा माणुसकीशून्य कारभार सुरू आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे!'',अशा शब्दांत भाजपावर टीकास्त्र सोडल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.   

टॅग्स :अविश्वास ठरावशिवसेनाउद्धव ठाकरेसंजय राऊत