Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:56 IST

Nitesh Rane Security, Bag: घटनेनंतर बंगल्याभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आणि कसून तपासाणी करण्यात आली

Nitesh Rane Security, Bag: मंत्री नितेश राणे यांच्या दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळ असलेल्या बंगल्याजवळ एक बेवारस बॅग आढळली. मुंबईपोलिस आणि बॉम्बशोधक पथकाने (BDDS) या बॅगची तपासणी केली. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांना सकाळच्या सुमारास नोकरांच्या क्वार्टरजवळ ही संशयास्पद बॅग दिसली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. या घटनेनंतर काही काळ खळबळ माजली होती. त्यामुळे बंगल्याभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती. तपासादरम्यान, बॅगमध्ये काही वस्तू आणि एक चिठ्ठी सापडली.

बॅगेत काय सापडले?

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे बॅगच्या मालकाचा शोध घेतला. तो मालक ४० वर्षीय अमेरिकन नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. हॉटेलमधून गोव्याला जाण्यापूर्वी तो माणूस आपले सामान घेऊन निधाला होता. त्या बॅगमध्ये बूट आणि कपडे होते आणि त्यासोबत बॅग मोकळी असल्याचे सांगणारी एक चिठ्ठीही आढळली. तो व्यक्ती तिथेच बॅग सोडून निघून गेल्याचे कळले. त्यानंतर काहीही संशयास्पद न आढळल्याने, पोलिसांनी परिसर सुरक्षित घोषित केला.

BDTS टीमने केली चाचणी

मंत्र्यांच्या बंगल्यासारख्या संवेदनशील ठिकाणी एका बेवारस बॅगची माहिती मिळताच, मरीन ड्राइव्ह पोलिस आणि BDTS टीम ताबडतोब घटनास्थळी पोहोचली. खबरदारी म्हणून, संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आणि त्याला घेराव घालण्यात आला. जेव्हा पथकातील लोकांनी बॅग उघडली. त्यांना तेव्हा कोणतीही धोकादायक वस्तू किंवा स्फोटके आढळली नाहीत. बॅगेत जुने कपडे आणि बूट आढळले. कोणताही संभाव्य धोका वगळण्यासाठी पोलिसांनी त्यात असलेल्या गोष्टींची कसून तपासणी केली. त्यानंतर परिसरातील सुरक्षायंत्रणेला याबाबत माहिती दिली.

सीसीटीव्हीने उलगडलं 'मोफत' वस्तूंचं रहस्य

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासले. फुटेजमध्ये मरीन ड्राइव्हवरील एका हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका परदेशी नागरिकाने बॅग ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला, तोपर्यंत तो गोव्यात पोहोचला होता. त्याने स्पष्ट केले की त्याने बॅगजवळ एक चिठ्ठी सोडली होती ज्यामध्ये लिहिले होते की, बूट आणि कपडे मोफत आहेत; कोणीही घेऊन जा.

English
हिंदी सारांश
Web Title : Suspicious bag near Nitesh Rane's bungalow sparks alarm; note found.

Web Summary : An unattended bag near Nitesh Rane's Mumbai bungalow caused a security scare. The bag contained clothes, shoes, and a note indicating they were free to take. CCTV revealed a foreign national left it. No explosives were found; the area was secured.
टॅग्स :नीतेश राणे मुंबईपोलिस